तब्बल १० वर्षांनंतर सुष्मिता सेनचे कमबॅक


तब्बल १० वर्षाच्या विश्रांतीनंतर माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली असून बऱ्याच काळापासून सुष्मिता चित्रपटांपासून लांब आहे. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर असल्यामुळे सुष्मिता एका शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सुष्मिता ‘आर्य’ या कार्यक्रमाद्वारे पडद्यावर भूमिका साकारणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. वेब प्लॅटफॉर्म डिझनी प्लस आणि हॉटस्टारवर स्ट्रीम हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची शूटिंग मागच्या वर्षीच सुरू झाली होती. राजस्थानच्या बॅकग्राउंडवर आधारित या कार्यक्रमाचे कथानक आहे.

एक फोटो शेअर करून सुष्मिताने चाहत्यांच्या प्रेमासाठी आभार मानले आहे. ती फक्त चाहत्यांसाठी तब्बल १० वर्षानंतर कमबॅक करत असल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे. आता सुष्मिताचे हे कमबॅक चाहत्यांच्या किती पसंतीस पडते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment