समुद्रातील खजिना शोधणार रोबॉट ‘ओशन वन’

समुद्राच्या तळाला असे अनेक रहस्य आहेत, ज्याबद्दल मनुष्याला अद्याप माहिती नाही. समुद्राच्या तळाखाली मोठ्या प्रमाणात खजिना असल्याचे देखील सांगितले जाते. हा बुडालेला खजिना शोधण्यासाठी तज्ञ अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. आता हा समुद्रातील खजिना शोधण्यासाठी रोबॉट तयार करण्यात आला आहे.

वैज्ञानिकांनी समुद्रात लपलेले रहस्य शोधण्यासाठी रोबॉटची निर्मिती केली आहे. या रोबॉटला ‘ओशन वन’ असे नाव देण्यात आले असून, याला स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीने बनवले आहे. याच्या मदतीने काही दिवसांपुर्वीच किंग लुईस ला लूनचा 350 वर्ष जुना समुद्रातील खजिना शोधण्यात आला. खजिन्याला उत्तर फ्रान्स येथील टोलन येथे शोधण्यात आले. हा खजिना 1664 मध्ये समुद्रात बुडाला होता.

ओशन वन रोबॉटला दोन हात, पाय आणि चेहरा देखील आहे. यासोबतच पाण्यात पुढे जाण्यासाठी रोबॉटला पंख देखील देण्यात आलेले आहेत. हा रोबॉट पुर्णपणे वॉटर प्रुफ देखील आहे. या रोबॉटला रिमोटद्वारे कंट्रोल करता येते.

वैज्ञानिकांचा दावा आहे की, हा रोबॉट स्वतः काम करू शकतो व आपल्या मार्गात येणारे अडथळे देखील दूर करू शकतो. हा रोबॉट खोल पाण्यात सहज जाऊ शकतो व कॅमेऱ्याच्या मदतीने महत्त्वाच्या गोष्टीचा व्हिडीओ देखील बनवू शकतात. खजिना शोधण्यासोबतच समुद्रातील तेलाच्या विहिरींना दुरुस्त करण्यासारखी कामे देखील हा रोबॉट करू शकतो.

Leave a Comment