भाईजानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये पूजा हेगडेची वर्णी


ऋतिक रोशनसोबत ‘मोहनजो दाड़ो’ मध्ये आणि अक्षय कुमारसोबत ‘हाउसफुल 4’ मध्ये काम केल्यानंतर आता सलमान खानसोबत पूजा हेगडे दिसणार आहे. सलमान खान अभिनीत ‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवालाने एका मुलाखतीमध्ये याची माहिती केले आहे, ज्यांनी यापूर्वी ‘हाउसफुल 4’मध्ये तिच्यासोबत काम केले आहे.

नाडियाडवाला म्हणाले, पूजासोबत हाउसफुल 4 मध्ये काम केल्यानंतर मला वाटले की, या चित्रपटासाठी ती परफेक्ट राहील. स्क्रीनवर तिची उपस्थिती उत्तम होती आणि सलमान खानसोबत तिची जोडी खूप छान दिसेल. ती कथेमध्ये फ्रेशनेस घेऊन येईल. रिपोर्ट्सनुसार, पूजा चित्रपटात एका स्मॉल टाउन गर्लच्या रोलमध्ये दिसणार आहे. पूजाचा बॉलिवूडमध्ये हा तिसरा चित्रपट असेल.

सांगितले जात आहे की, याचवर्षी ऑक्टोबरमध्ये चित्रपट फ्लोअरवर येऊ शकतो. हा अ‍ॅक्शन आणि कॉमेडीने भरपूर असेल. साजिद नाडियाडवालाने चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि फरहाद सामजी हा दिग्दर्शित करणार आहेत. चित्रपट पुढच्यावर्षी ईदला रिलीज होईल.

Leave a Comment