रात्रीच्या जेवणासाठी सूप आणि सॅलड की वरणभात?


आपल्या आरोग्याविषयी सध्या बहुतेक लोक जागरूक झालेले आहेत. विशेषतः ज्यांचे वजन वाजवीपेक्षा अधिक आहे, त्यांना वजन घटवायचे असते, आणि ज्यांचे वजन अगदी प्रमाणशीर असते, त्यांना ते तसेच ‘मेंटेन’ करायचे असते. त्यामुळे एकंदर सर्वच जण यासाठी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. दिवसभर आहाराचे गणित सांभाळल्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये काय खावे हा प्रश्न अनेकांना पडत असतो. म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये सूप आणि सॅलड असा मेनू असावा, की साधा वरण भात हा प्रश्न असतो.

याविषयी बोलताना सेलिब्रिटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर, आपण जो आहार लहानपणापासून घेतला, ज्या आहारावर आपण वाढलो, तोच आहार आपल्यासाठी योग्य असल्याचे म्हणतात. आपण लहानपणापासून वाढलो, त्या आहाराची आपल्या शरीराला आधीपासूनच सवय असल्याने ह्या आहारामुळे शरीराला नुकसान होण्याची शक्यता नसते. त्यामुळे सूप व सॅलडच्या ऐवजी आपल्या रोजच्या सवयीचा वरणभातच खायला हवा, असे ऋजुता म्हणतात.

बाहेरून आलेले, म्हणजेच इम्पोर्टेड खाद्यपदार्थ आपली विक्री वाढविण्याकरिता त्यांचा आरोग्यासाठी उपयोग पटवून देण्यासाठी जाहिराती करीत असतात. ह्याच कारणामुळे अॅवोकाडो, गोजी बेरी, ब्ल्यू बेरी यासारख्या वस्तूंना आता आपल्या बाजारांमध्ये मोठी मागणी आहे. पण ऋजुताच्या म्हणण्यानुसार वरण भात हा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग असून, आपल्या शरीराला याच आहाराची सवय अगदी लहानपणापासून असते. त्यामुळे हा आहार पोट आणि मन दोन्हीला समाधान देणारा आहे. भातामध्ये असलेले अॅमिनो अॅसिड्स, फायटोन्यूट्रीयंट्स, आणि जीवनसत्वानी परिपूर्ण आहे. त्याच्या जोडीने खाल्ल्या जाणाऱ्या वरणामध्ये किंवा डाळीमध्ये प्रथिने भरपूर मात्रेमध्ये असतात. शिवाय यामध्ये असलेली कर्बोदके भूक शांत करण्यास सहायक आहेत. त्यामुळे हाच आहार आपल्यासाठी योग्य असल्याचे ऋजुता म्हणतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment