या भारतीयाने शोधले प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्त्याच्या निर्मितीचे तंत्र

प्लास्टिक आज पर्यावरणासाठी मोठी समस्या झाली आहे. वैज्ञानिकांनुसार, एक प्लास्टिक नष्ट होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. एकीकडे जगातील अनेक वैज्ञानिक प्लास्टिकची समस्या सोडवण्यासाठी पर्याय शोध आहेत, तर दुसरीकडे एका भारतीयाने प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्ते बनविण्याची प्रक्रिया आहे.

या व्यक्तीचे नाव राजगोपालन वासुदेवन असून, त्यांना ‘प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया’ म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी एक असे तंत्र शोधले आहे, ज्याद्वारे प्लास्टिकचा रस्ते बनविण्यासाठी वापर करता येईल.

वासुदेवन मुदरै युनिवर्सिटीद्वारे मान्यताप्राप्त कॉलेज Thiagarajar College Of Engineering मध्ये केमिस्ट्रीचे प्राध्यापक आहेत. येथेच त्यांनी प्लास्टिक कचऱ्यापासून सुटका व्हावी यासाठी अनेक वर्ष संशोधन केले. वर्ष 2002 मध्ये त्यांनी प्लास्टिकच्या कचऱ्यापासून रस्ता बनविण्याचे तंत्र देखील शोधले. याचे त्यांनी पेटंट देखील केले. आज त्यांच्या या तंत्रामुळे देशातील अनेक राज्यांमधील गावांमध्ये रस्ते बनत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देखील या टेक्निकचा वापर करत आहे. या टेक्निकच्या मदतीने आतापर्यंत भारतात जवळपास 1 लाख किलोमीटरच्या रस्त्याची निर्मिती झाली आहे. वर्ष 2018 मध्ये सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मान केला होता.

वासुदेवन यांच्या या तंत्राने जगभरातील लोकांचे लक्ष आकर्षित केले. अनेक देशांनी हे तंत्र खरेदी करण्यासाठी देखील संपर्क केला. मात्र त्यांनी यास नकार दिला. त्यांनी हे तंत्र भारत सरकारला दिले. सरकार आता या तंत्राच्या मदतीने इंडोनेशिया-नेदरलँड या देशांमध्ये देखील रस्ते निर्माण करत आहे.

ब्रिटन सरकारने देखील या तंत्राला अधिक आधुनिक करण्यासाठी 1.6 मिलियन पाउंडची गुंतवणूक करणार असल्याचे देखील म्हटले आहे.

Leave a Comment