आता लंडनमध्ये धावणार भारतीय कंपनीच्या कॅब

भारतात अ‍ॅपद्वारे कॅब सेवा देणारी खाजगी कंपनी ओलाची सेवा आता ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये देखील सुरू होणार आहे. लंडनमध्ये कंपनीने कंफर्ट, कंफर्ट एक्सल आणि एक्झिक्यूटिव्ह राइड अशा तीन श्रेणीतील सुविधा देणार आहे. कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर 25 हजारांपेक्षा अधिक चालक रजिस्टर्ड आहेत.

कंपनीला आशा आहे की लंडनमधील सुरुवात जागतिक विस्तार होईल. ओलाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भवीष अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलनुसार, लंडन आमच्यासाठी कॅब सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जागतिक ताकद आणि मुख्य कंपनी बनण्याच्या आमच्या प्रवासाची सुरुवात आहे. खूप कमी भारतीय ब्रँड आहेत जे एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि या महत्वकांक्षेसोबत जागतिक बाजारात उतरतात. आपला प्रवास आणि यश एक कीर्तिमान स्थापित करेल.

भवीश अग्रवाल यांच्यानुसार, पुढील 3 महिने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. कंपनी चालक, सुरक्षा आणि स्थानिक अधिकारी व नियमांकांसोबत सहकाराच्या दृष्टीने योग्य काम करेल.

ओला आंतरराष्ट्रीयचे प्रमुख सिमॉन स्मिथ म्हणाले की, लंडनमध्ये सेवा सुरू झाल्याने आम्ही उत्साहित आहोत. ही आमच्या व्यवसायाच्या दृष्टीने मोठी कामगिरी आहे.

ओलाने मागील वर्षी कार्डिफमध्ये आपली सेवा सुरू केली होती. त्यानंतर बर्मिंघम. लिव्हरपूल, एक्सेटर, रीडिंग, ब्रिस्टल, बाथ, कोवेंट्री आणि वारविक येथे आपल्या सेवेचा विस्तार केला आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये ओलाने ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे देखील आपली सेवा सुरू केली होती. ओला ऑस्ट्रेलियामध्ये 40 हजारांपेक्षा अधिक चालकांसोबत काम करते. तर न्यूझीलंडमध्ये 85 हजारांपेक्षा अधिक चालक ओलासोबत काम करतात.

Leave a Comment