तुमचे स्टेशन येण्याआधी ‘वेक-अप’ कॉल देणार रेल्वे

अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना अचानक झोप लागते व तुमचे स्टेशन निघून गेलेले असते. त्यामुळे अडचण निर्माण होते. आता प्रवाशांसाठी  भारतीय रेल्वेने एक खास सुविधा सुरू केली आहे. आता रेल्वेकडून प्रवाशांना त्यांचे स्टेशन येण्याआधी अर्धातास 1 वेक-अप कॉलद्वारे अलर्ट करण्यात येईल.

याचा फायदा जे प्रवासी प्रवासात निवांत झोपतात त्यांना होणार आहे. अशा प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी रेल्वेने ही सेवा सुरु केली आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ही सेवा आयआरसीटीसी आणि भारत बीपीओ यांचा संयुक्त उपक्रम आहे. या सेवेसाठी प्रवाशांना रेल्वे सहाय्यता क्रमांक 139 वर फोन करावा लागेल. या सेवेंतर्गत ठराविक स्टेशनवर रेल्वे पोहचण्याआधी प्रवाशाच्या रजिस्टर्ड नंबरवर अलर्ट कॉल येईल.

या सेवेचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना 139 या क्रमांकावर कॉल करून पीएनआर नंबर, स्टेशनचे नाव, स्टेशनचा एसटीडी कोड यासारखी माहिती द्यावी लागेल. 131 हा रेल्वे संबंधित माहिती देणारा प्रमुख क्रमांक आहे.

Leave a Comment