ही व्यक्ती चक्क ‘च्युइंग गम’वर काढते पेटिंग

अनेकदा आपण च्युइंग गम खाल्यावर ते रस्यावर तसेच थुकतो. मात्र याच च्युइंग गमवर लंडनमधील एका माणसाने आपली हटके कलाकृती सादर करत आहे. लंडनमधील 57 वर्षीय बेन बिल्सन मागील 15 वर्षांपासून लंडनमध्ये प्रवास करत आहेत. ते प्रवाशांनी रस्त्यावर थुंकलेल्या च्युइंग गमवर शिल्प अथवा रंगीत नकाक्षी काढतात.

विल्सन यांच्यासाठी ही काही एक विलक्षण आवड नसून, हे त्यांच्यासाठी एक कलेचे रुप आहे, तसेच ते याला रिसायक्लिंगचा देखील एक प्रकार मानतात.

विल्सन यांनी सांगितले की, मी कचऱ्याला (च्युइंग गम) पुर्णपणे बदलतो आणि त्याला कलेचे एक साधन बनवतो. हा एक रिसायक्लिंगचाच प्रकार आहे. यापासून काहीतरी सकारात्मक करण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यांची च्युइंग गमवरील हटके निर्मिती एखाद्या लहानशा नाण्याएवढी आहे. त्यांची हटके निर्मिती पेडेस्ट्रियन ब्रिज आणि तेथील आजुबाजूच्या भागात पहायला मिळते. अनेक कलाकृतींवर जवळील चर्चची प्रतिमा असते, तर काही कलाकृती विविध रंगाच्या असतात.

च्युइंग गमवर कलाकृती तयार करण्याआधी विल्सन लाकडावर कोरीव काम करण्याचे काम करत असे. आता त्यांना त्यांच्या कामासाठी च्युइंग गम मॅन म्हणून देखील ओळखले जाते.

View this post on Instagram

A small gumpic collection

A post shared by Ben Wilson (@benwilsonchewinggumman) on

विल्सन यांच्या कामाची पद्धत सोपी आहे. ते शहरातील रस्ते, गल्ल्या येथे च्युइंग गम शोधतात. त्यानंतर ते ब्रेश, रासायनिक रंग, वॉर्निश आणि गमला विरघळवण्यासाठी बर्नर या आपल्या उपकरणाचा वापर करून च्युइंग गमवर सुंदर पेटिंग काढतात.

View this post on Instagram

Another gum pics for the New York show. #StPauls #London #art

A post shared by Ben Wilson (@benwilsonchewinggumman) on

आतापर्यंत विल्सन यांनी हजारो च्युइंग गमवर पेटिंग तयार केली आहे व याबद्दल त्यांना अभिमान देखील आहे. विल्सन उत्पन्नासाठी गॅलरीज आणि अन्य कलाकारांसोबत देखील काम करतात. मात्र लोकांनी दिलेले पैसे ते नाकारतात.

Leave a Comment