हा पठ्ठ्या बनवतो चक्क बूट, आयफोन या सारख्या आकारांचे केक

एखादा पदार्थ हा चवीला कसा आहे यापेक्षा तो प्लेटमध्ये दिल्यानंतर किती सुंदर आहे, हे महत्त्वाचे असते. शेफ अथवा क्यूरेट आपले पदार्थ हे सोशल मीडियावर अधिकाधिक व्ह्यूवरशीप कशी मिळतील या दृष्टीने अधिक सुंदर बनवत असतात. सोशल मीडियावर असे सुंदर पदार्थ, डिशेज शेअर करण्यासाठी चवीपेक्षा त्या पदार्थीच्या दिसण्याकडे आजकाल अधिक लक्ष दिले जाते. असाच एक केक कलाकार आणि कंटेट क्रिएटर असलेला लूक विन्सेंटिनी हटके आकाराचे केक तयार करतो व त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो.

View this post on Instagram

Salty then sweet 🎂 ➡️ Swipe! ➡️

A post shared by Luke Vincentini (@lukevincentini) on

मूळचा अमेरिकेतील न्यू जर्सी येथील असलेल्या लूकचे इंस्टाग्रामवर 4 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. लूक आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सर्वसाधारण केकपेक्षा तुम्ही पाहिलेही नसतील अशा आकाराचे केक बनवून त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. यामध्ये वेफर्सचे पॉकिट, मोठी बेल, आयफोन आणि लोकरीच्या दोरीचा बॉल याचा देखील समावेश आहे. त्याचा प्रत्येक केक एकदम हटके असतो.

त्याचा केकचा आकार सर्वसाधरणपणे घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर आधारित असतो. सोशल मीडियावर देखील युजर्स त्याच्या या कलेचे कौतूक करतात. हे केक बनविण्यासाठी तो फोंडट, बटरक्रिम, चॉकलेट आणि जेलच्या रंगाचा देखील वापर करतो.

त्याला एक केक बनविण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 तास लागतात. मात्र केकचा आकार आणि त्यावरील डिझाईन वेगळी असेल तर अधिक वेळ जातो.

लूकने सांगितले की, व्यावसायिक बेकर्स आणि केक डेकोरेटर्सला त्याचे केक्स आवडत नाहीत. मात्र या व्यवसायाशी संबंधित नसलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहून आनंद होतो.

 

Leave a Comment