फेसबुक डिलीट करा, एलॉन मस्क यांचे आवाहन

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट केले की, युजर्सनी फेसबुक डिलीट करायला हवे.

लोकप्रिय अभिनेता साचा बॅरोन कोहेनने ट्विट करत फेक न्यूजबद्दल फेसबुकवर निशाणा साधला होता. त्याने फेसबुकच्या विश्वसनीयतेवर देखील प्रश्न उपस्थित केले होते.

कोहेनने ट्विट केले होते की, आपण एका व्यक्तीला 2.5 अब्ज लोकांना मिळणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेऊ देत नाही. एका व्यक्तीला 2.5 अब्ज लोकांना  मिळणाऱ्या वीजेचे नियंत्रण करू देत नाही. तर एका व्यक्तीला 2.5 अब्ज लोकांची खाजगी माहिती कशी नियंत्रणात ठेऊ देतो ? सरकारने फेसबुकवर नियंत्रण ठेवले पाहिजे, ना की एखाद्या शासकाने.

याच ट्विटला उत्तर देताना एलॉन मस्क यांनी फेसबुक डिलीट करण्याचे आवाहन केले.

याआधी देखील अनेक एलॉन मस्क यांना फेसबुकवर टीका केली आहे. वर्ष 2019 मध्ये टेस्ला यांनी आपले फेसबुक अकाउंट डिलीट केले होते. टेलिग्रामचे संस्थापक पाव्हेल डुरोव्ह यांनी देखील फेसबुकच्या मालकीचे व्हॉट्सअप धोकादायक असल्याचे काही दिवसांपुर्वी म्हटले होते. यामुळे लाखो युजर्सचा डेटा धोक्यात असून, सर्व युजर्सनी मेसेजिंगसाठी टेलिग्रामचा वापर करावा, असे पाव्हेल म्हणाले होते.

Leave a Comment