बिग बी आणि विक्रम गोखले ‘या’ चित्रपटात येणार एकत्र


लवकरच ‘एबी आणि सीडी’ या मराठी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन हे भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचीही मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. नुकतेच चित्रपटाचे पहिले पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.


या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद लेले यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. १३ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर अमिताभ बच्चन यांनी शेअर केले आहे. ‘एबी आणि सीडी’चा याराना, बघेल आता जमाना’ असे कॅप्शनही त्यांनी यावर दिले आहे.

सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, शर्वरी लोहोकरे, नीना कुलकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment