चीनी सैन्याने केली जगातील सर्वात मोठी हॅकिंग, अमेरिकेचा आरोप

2017 मध्ये चीनच्या सैन्याकडून जगातील सर्वात मोठी हॅकिंग करण्यात आली होती. या हॅकिंगमुळे लाखो लोकांची खाजगी माहिती लीक झाली होती. आता अमेरिकेने कंझ्यूमर डेटा हॅक करण्यासाठी चीनी सैन्याच्या 4 जणांवर आरोप केले आहेत. या चारही जणांवर इक्विफॅक्स क्रेडिट रिपोर्टिंग एजेंसी आणि कोट्यावधी अमेरिकन नागरिकांची खाजगी माहिती चोरी करण्याचा आरोप आहे.

2017 मध्ये या हॅकिंगमुळे 14 कोटी लोकांवर परिणाम झाला होता. हॅकर्सने नाव, पत्ती, सोशल सिक्युरिटी नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि कंपनीच्या डेटाबेसमधील सर्व माहिती चोरी केली होती. चीनी सैन्य पीपल्स लिबरेशन ऑर्मीच्या चार सदस्यांवर कंपनीचे चार व्यापार रहस्य सारखा डेटाबेस चोरी करण्याचा देखील आरोप आहे.

या हॅकर्सनी एक सॉफ्टवेअर नसल्याने इक्विफॅक्स कंपनीच्या डेटाबेसमधली माहिती सहज चोरी केली होती. त्यांनी युजर्सचे लॉगइन आणि पासवर्ड मिळवले होते, ज्याचा वापर ते डेटाबेसला नेव्हिगेट करणे आणि रेकॉर्ड्स रिव्ह्यू करण्यासाठी करत असे. हॅकर्स युजर्सचे दररोजची लॉग फाइल देखील डिलीट करत असे. यासोबतच 20 देशांच्या सर्व्हरद्वारे ट्रॅफिक रुटिंगचा देखील समावेश होता.

अ‍ॅटॉर्नी जनरल विलियम बार म्हणाले की, एवढ्या मोठ्या स्तरावर हॅकिंग होणे ही धक्कादायक बाब आहे. यामुळे इक्विफॅक्स कंपनीला केवळ आर्थिक नुकसानच झाले नाही तर लाखो अमेरिकन नागरिकांच्या गोपनियतेचे उल्लंघन झाले आहे.

सर्व आरोपी हॅकर्स चीनचे असून, अद्याप कोणालाच अटक करण्यात आलेली नाही.

Leave a Comment