आली १ रुपयाची नवी नोट


फोटो सौजन्य फिनान्शियल एक्सप्रेस
अर्थमंत्रालयाने १ रुपयाच्या नव्या नोटेच्या छपाईची अधिसूचना जारी केली असून या नोटेचा रंग, आकार, मानके, वजन, डिझाईन याची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या बातमीनुसार या नोटेचा आकार ९.७ बाय ६.३ सेंटीमीटर असून त्यात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वर भारत सरकार असे लिहिले गेले आहे.

अर्थसचिव अतनू चक्रवर्ती यांची या नोटेवर दोन भाषांत सही असून या नोटेवर अनेक प्रकारचे वॉटरमार्क आहेत. त्यात अशोकस्तंभ आहे पण सत्यमेव जयते नाही. मध्यात एक तर उजवीकडे व्हर्टिकल स्टाईल मध्ये भारत अशी अक्षरे लपलेली आहेत. तसेच १ रुपयाच्या नव्या नाण्याची प्रतिकृती आहे. नोटेचा रंग हिरवा गुलाबी आहे.

१ रुपयाची नोट हे भारतीय चलनातील सर्वात कमी मूल्याचे कागदी चलन आहे. १ रुपयाच्या नोटा रिझर्व बँकेकडून नाही तर भारत सरकार कडून जारी केल्या जातात त्यामुळे त्याच्यावर अर्थ सचिवांची सही असते. १ रुपयाची पहिली नोट ३० नोव्हेंबर १९१७ ला छापली गेली होती त्यावर किंग जॉर्ज पंचम यांचा फोटो होता. रिझर्व बँकेच्या वेबसाईटनुसार १९२६ साली या नोटेची छपाई बंद झाली. त्यानंतर १९४० मध्ये १ रुपयाच्या नोटा पुन्हा छापल्या गेल्या आणि १९९४ मध्ये या नोटा छपाई बंद झाली. २०१५ पासून १ रुपयाची नोट पुन्हा छापली जाऊ लागली आहे.

Leave a Comment