देशात टाटा, अडाणी, ह्युंदाईच्या रेल्वे धावणार


फोटो सौजन्य ऑफिसचाई
भारतातील रेल्वेरुळावरून भारतीय रेल्वेबरोबरच टाटा, अडाणी, ह्युंदाई यांच्या रेल्वे लवकरच धावतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच सादर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील पर्यटनस्थळे जोडण्यासाठी तेजस च्या धर्तीवर आणखी खासगी ट्रेन चालविल्या जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार देशातील विभिन्न मार्गावर १५० अश्या खासगी रेल्वे सुरु केल्या जात आहेत. या रेल्वे चालविण्यासाठी दोन डझनाहून अधिक कंपन्यांनी रुची दाखविली असल्याचे समजते.

अश्या खासगी रेल्वे चालविण्यात टाटा रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर, अडाणी पोर्ट, ह्युंदाई रोटेम कंपनी, एलस्ट्रॅम ट्रान्सपोर्ट, बाँबर्डीअर, सिमेन्स एजी, मॅक्वेरी, हिताची इंडिया, साउथ आशिया, व एस्सेल स्टील ग्रुप यांनी रस दाखविला आहे. या १५० गाड्या १०० विविध मार्गावर धावणार असून त्याची यादी जाहीर केली गेली आहे. त्यानुसार हे मार्ग १० ते १२ क्लस्टर मध्ये विभागले जात आहेत.

या मार्गात मुंबई दिल्ली, चेन्नई दिल्ली, दिल्ली हावडा, शालीमार पुणे, नवी दिल्ली पटना या मार्गांचा समावेश असून या रेल्वे गाड्यांचे संचालन, देखभाल संबंधित कंपन्या करणार आहेत. या गाड्यांचे भाडे ठरविण्याचे अधिकार संबंधित कंपनीला मिळणार आहेत.

Leave a Comment