कोरोना मुळे अमेझॉनची मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मधून एक्झिट


स्पेनच्या बार्सिलोना येथे या महिन्यात होत असलेल्या वर्ल्ड मोबाईल कॉंग्रेस मधून बाहेर पडत असल्याची घोषणा अमेझॉन डॉट कॉम ने केली असून यासाठी चीन मध्ये फैलाव झालेला करोना विषाणूचे कारण दिले गेले आहे. टेलिकॉम उद्योग जगतातील हा सर्वात मोठा इव्हेंट असतो आणि या काळात बार्सिलोना मध्ये सरासरी एक लाखाहून अधिक ग्राहक भेट देतात. रविवारी कोरोना साथीमुळे अमेझॉन या इव्हेंट मधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले असून कंपनीच्या क्लाउड कॉम्प्युटिंग आर्म एडब्यूे एसच्याच्या माध्यमातून महत्वपूर्ण उपस्थितीची योजना आखली गेली होती असे नमूद केले आहे.

द. कोरियाची एलजी, स्वीडिश उपकरण निर्माती एरिक्सन, अमेरिकन चीप मेकर एनव्हीडीया, सोनी नंतर या कार्यक्रमातून बाहेर पडणारी अमेझॉन पाचवी कंपनी आहे. आयोजक जीएसएमए टेलिकॉन संस्थेने अमेझॉनच्या बातमीला दुजोरा दिला आहे. चीनच्या हुबेई प्रांतातील कुणालाही या महोत्सवात हजर राहण्यास परवानगी दिली गेलेली नाही असेही समजते. तरीही ज्यांना या महोत्सवात यायचे असेल त्यांनी कोरोना फैलाव होण्याअगोदर संबंधित व्यक्ती किमान १५ दिवस चीन बाहेर होती हे सिद्ध करायचे आहे. ह्युवावे आणि झेडटीई या चीनी कंपन्या या कॉंग्रेस मध्ये सामील होणार आहेत.

Leave a Comment