इतिहास प्रेमाचे प्रतिक बनलेल्या टेडी बेअरचा


सध्या जगातील अनेक देशात व्हॅलेंटाईन विक साजरा होत असून त्यातील चौथा दिवस १० फेब्रुवारीला साजरा झाला. हा दिवस टेडी डे म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने प्रेमी एकमेकांना टेडी बेअर भेट देतात. ग्रेट ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी या देशात हा दिवस खास लोकप्रिय आहे. या टेडी बेअरचा संबंध अमेरिकन राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांच्याशी आहे याची अनेकांना कल्पना नसेल.

असे सांगतात अमेरिकेचे २६ वे अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट लुसियाना आणि मिसिसिपी या राज्यातील वाद सोडविण्यासाठी मिसिसिपीला गेले होते. तेव्हा ते जंगलात शिकारीला गेले तेव्हा एका झाडाला जखमी अवस्थेत बांधून ठेवलेले अस्वल त्यांना दिसले. रूझवेल्ट यांच्या अधिकाऱ्यानी अध्यक्षांनी याच अस्वलाची शिकार करावी असे सुचविले तेव्हा त्यांनी जखमी प्राण्यांना मारता कामा नये असे सांगितले. ही बातमी मीडियात गेली तेव्हा अस्वलासोबतचा रूझवेल्ट यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला. क्लिफोर्ड या कार्टूनिस्टने त्यासंदर्भात एक कार्टून काढले आणि मग काही कंपन्यांनी अस्वलाचे खेळणे बाजारात आणले. त्याला टेडी नाव दिले कारण रूझवेल्ट यांचे निकनेम टेडी होते.


व्हॅलेंटाइन विक मधील टेडी डे ला एकमेकांना टेडी देण्याची प्रथा असून त्यात टेडीच्या रंगावर तुमच्या भावना ओळखल्या जातात. गुलाबी आणि लाल हे दोन्ही रंग प्रेमाचे प्रतिक असले तरी लाल टेडी मुलांनी मुलीना द्यायचे असते. एकमेकावरील प्रेमाचे ते प्रतिक आहे. ऑरेंज रंगाचे टेडी आनंद, आशा, उबदारपणाचे प्रतिक आहे तर पांढऱ्या रंगाचे टेडी प्रेमाशी बांधिलकी, विश्वास, निष्ठा यांचे प्रतिक आहे. निळे टेडी प्रेम गहिरे आणि स्थिर असल्याचे प्रतिक मानले जाते तर हिरवे टेडी ताजेपणा, सद्भाव याचे प्रतिक मानले गेले आहे.

Leave a Comment