अवघ्या 10 सेंकदात ‘अनलॉक’ करा तुमचा ‘लॉक’ झालेला फोन

स्मार्टफोनचा वापर करताना त्याच्या सुरक्षेची देखील काळजी घेणे गरजेचे असते. अनेकजण सुरक्षेसाठी पिन, पॅटर्न अथवा पासवर्ड ठेवतात. याशिवाय फेसलॉक फीचर देखील अनेक फोनमध्ये मिळत आहे. अनेकदा दुसऱ्या कोणाच्याच लक्षात येऊन नये म्हणून अनेकजण अवघड पिन अथवा पासवर्ड ठेवतात. मात्र हा पासवर्ड स्वतःच विसरतात. पासवर्ड अथवा पिन विसरल्यास फोन अनलॉक कसा करायचा ? हे जाणून घेऊया.

स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला दुसऱ्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरवर जाऊन https://myaccount.google.com/find-your-phone-guide हे सर्च करावे लागेल. त्यानंतर तुमच्या लॉक झालेल्या फोनमध्ये असलेले जीमेल अकाउंट लॉग इन करा.

Image Credited – Amarujala

त्यानंतर तुम्हाला त्या डिव्हाईसची यादी दिसेल, ज्यात तुमचे जीमेल अकाउंट लॉग इन आहे. त्यानंतर ज्या डिव्हाईसचे लॉक उघडायचे आहे, ते डिव्हाईस निवडा.

Image Credited – Amarujala

त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर लॉक यूर फोनचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड पिन अथवा पॅटर्न टाकावा लागेल. एवढे केल्यानंतर तुमचा पासवर्ड सहज बदलेल. यानंतर तुम्ही तुमचा फोन अनलॉक करू शकता, मात्र यासाठी तुमच्या डिव्हाईसमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.

या व्यतरिक्त तुम्ही गुगल असिस्टंटच्या मदतीने देखील फोन अनलॉक करू शकता. जर तुम्ही गुगल असिस्टंट आधी सेट केले असेल व स्वतःचा आवाज रिकॉर्ड केला असेल. तसेच ‘Unlock with voice’ पर्यायावर क्लिक केलेले असणे गरजेचे आहे. यानंतर तुम्ही गुगल असिस्टंटला कमांड देऊन फोन अनलॉक करू शकता.

Leave a Comment