देशात पहिल्यांदाच ह्रदयाची समस्या असल्याने श्वानाला बसवले पेसमेकर

देशात पहिल्यांदाच कुत्रीला रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याने पेसमेकर लावण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे कुत्रीच्या ह्रदयाचे ठोके प्रती मिनिट 60 ते 120 बीट्स असतात. मात्र खुशी नावाच्या कुत्रीच्या ह्रदयाचे ठोके प्रती मिनिट 20 बीट्सपर्यंत आले होते. त्यामुळे धोका वाढला होता. अखेर कुत्रीवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली.

खुशीच्या शरीरात पेसमेकर इम्प्लांट करण्यास डॉक्टरांना दीड तास लागले. कुत्रीवरील शस्त्रक्रिया दिल्लीच्या ग्रेटर कैलाश येथील मॅक्स वेट्स हॉस्पिटलमध्ये झाली. पशुवैद्यकीय डॉक्टरांचा दावा आहे की, ही देशातील अशाप्रकारी शस्त्रक्रिया आहे.

प्राण्यांचे इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर भानू देव शर्मा यांनी सांगितले की, कॉकर स्पेनियल प्रजातीच्या कुत्रीचे ह्रदय सामान्य प्रक्रियेप्रमाणे धडकत नव्हते. ह्रदयात रक्तप्रवाहाला अडथळे निर्माण झाल्याने ती वारंवार बेशुद्ध होत असे.

मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये खुशीच्या कानाचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी देखील ती बेशुद्ध पडली होती. मात्र डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवले. यानंतर खुशीची तपासणी केल्यानंतर तिच्या ह्रदयात ब्लॉकेज असल्याचे समोर आले होते. शस्त्रक्रियेनंतर खुशी आता व्यवस्थित आहे.

Leave a Comment