फटाक्यांच्या आतिशबाजीची गिनीज बुकमध्ये नोंद

अमेरिकेच्या कोलोराडा येथे दरवर्षी होणाऱ्या विंटर कार्निव्हल दरम्यान जगातील सर्वात मोठी फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. यामुळे संपुर्ण आकाश लाल गडद रंगाचे झाले होते. याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील करण्यात आली आहे.

ही आतिशबाजी एमराल्ड माउंटेनवर करण्यात आली. येथून 5 मीटर व्यासाचा गोळा सोडण्यात आला. याचे वजन जवळपास 1270 किलो होते व 62 इंच उंच होता. यासाठी स्टीमबोट फायरवर्क्सच्या टीमने 26 फूट स्टील ट्यूबचा वापर केला.

स्टील ट्यूबद्वारे ताशी 482 किमी वेगाने दारूचा गोळा हवेत उडविण्यात आला. जवळपास दीड किमी उंचावर गेल्यावर या गोळ्याचा विस्फोट झाला. याआधी 2018 मध्ये सर्वात मोठी आतिशबाजी करण्याचा विक्रम संयुक्त अरब अमिरातच्या नावावर होता. त्यांनी 1087.26 किलो वजनी दारूच्या गोळ्याद्वारे आतिशबाजी केली होती.

हा दारूचा गोळा तयार करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागला. दररोज 8 तास यावर काम करण्यात आले. याला सुरक्षित बनविण्यासाठी 80 किमी टेपचा वापर करण्यात आला होता.

Leave a Comment