गायक अरिजीत सिंहने एकाच वेळी खरेदी केले 4 फ्लॅट


बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि प्रतिभावान गायकांपैकी एक असलेला अरिजीत सिंग कदाचित कॅमेर्‍यापासून दूर असेल, पण त्याचा सुमधुर आवाज लोकांच्या मनावर जादू करतो. एकापेक्षा एक अशी जबरदस्त हिट गाणी देणारा आणि अनेक लोकप्रिय पुरस्कार मिळविणारा अरिजीत सिंह सध्या आपल्या फ्लॅटमुळे चर्चेत आहे.

स्क्वेअर फीट इंडियाच्या वृत्तानुसार, गायक अरिजीत सिंहने एक नव्हे तर तब्बल 4 फ्लॅट्स खरेदी केले आहेत, ज्यांचे मूल्य कोटींमध्ये आहे. अरिजीतने हे फ्लॅट मुंबईच्या वर्सोवा भागात खरेदी केले, जो एक पॉश परिसर मानला जातो.

त्यांच्या वृत्तानुसार अरिजीतने घेतलेले सर्व चार फ्लॅट्स सविता सीएचएस नावाच्या इमारतीतील 7 बंगल्यांमध्ये आहेत. पहिल्या फ्लॅटची किंमत 1.80 कोटी असल्याचे सांगितले जाते, जे सहाव्या मजल्यावर आहे. त्याच मजल्यावरील अरिजीतने आणखी तीन फ्लॅट घेतले आहेत, ज्यांचे मूल्य 2.20, 2.60 आणि 2.50 कोटी आहे. म्हणजेच अरिजीतने हे चारही फ्लॅट जवळपास 9.1 कोटीमध्ये विकत घेतले.

Leave a Comment