येथे आहे 24 तास चालणारा जगातील पहिला सोलर प्लांट

राजस्थानच्या आबू रोड येथील ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये जगातील पहिला असा सोलर प्लांट तयार करण्यात आला आहे, जो 24 तास सुरू असतो. यामध्ये थर्मल स्टोरेजची देखील सुविधा आहे, ज्यात सुर्याची गरमी जमा केली जाते. या प्लांटमध्येच पहिल्यांदा पॅराबोलिक रिफ्लेक्टर विथ फोक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.  हे पॅराबोलिक रिफ्लेक्टर सुर्याच्या दिशेसोबत फिरते. याला इंडिया वन असे नाव देण्यात आलेले आहे.

यासाठी 70 टक्के फंडिग भारत आणि जर्मनीच्या सरकारने केली असून, इतर 30 टक्के ब्रह्मकुमारी संस्थेने खर्च केले आहेत. येथे जगभरातून हजारो विद्यार्थी संशोधनासाठी येतात. या प्लांटद्वारेच दररोज 35 हजार जणांचे जेवण बनते. सोबतच 20 हजार लोकांच्या टाउनशिपला वीज मिळते.

प्लांटचे प्लानिंग मॅनेजर बीके योगेंद्र यांनी सांगितले की, 25 एकरमध्ये पसरलेल्या या प्लांटमध्ये 770 पॅराबोलिक रिफ्लेक्टर आहे. 1 रिफ्लेक्टर 600 वर्गफूटाचे असते. सुर्याची किरणे रिफ्लेक्टरला लागलेल्या काचेला स्पर्श करतात. रिफ्लेक्टरजवळील फिक्स फोक्स बॉक्स या किरणांना जमा करते. याच्या आतील कॉइलमध्ये पाण्याद्वारे वाफ तयार होते व याचद्वारे जेवण बनते. वाफ टर्बाइनद्वारे वीज बनते.

या प्लांटचे 90 टक्के काम येथेच झाले असून, केवळ सोलर ग्रिड मिरर अमेरिकेवरून मागवण्यात आले आहेत. 30 वर्ष हा प्लांट तसाच राहिल.

Leave a Comment