हा दृष्टीहिन खेळाडू ठरला ‘आयरनमॅन’ मॅरोथॉन पुर्ण करणारा पहिला भारतीय

महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथे राहणाऱ्या निकेत दलालने देशाचे नाव उंचावेल अशी कामगिरी केली आहे. निकेल पहिला असा दृष्टीहिन भारतीय खेळाडू ठरला आहे, ज्याने आयरन मॅन ट्रायथलॉन स्पर्धा पुर्ण केली आहे. या स्पर्धेत 1.9 किमी अंतर पोहून पार करायचे असते, 90 किमी सायकलिंग आणि 21.1 किमी अंतर धावत पुर्ण करायचे असते.

ही स्पर्धा न थांबता 8 तासात पुर्ण करायची असते. 38 वर्षीय निकेत दलाल आणि त्याचा सहकारी 27 वर्षीय अहराम शेखने 7 तास 44 मिनिटात हे अंतर पुर्ण केले.

Image Credited – Navbharattimes

या शर्यतीसाठी दलालने मागील 4 महिन्यांपासून खूप मेहनत घेतली. निकेतने डिफरेंटली एबल्ड अ‍ॅथलीट्स विभागात दुसरे स्थान मिळवले. त्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. निकेत दलाल हा एक प्रोफेशनल स्पीच थेरेपीस्ट आहे. तर शेखने पुण्यातून कॉम्प्यूटर सायन्समध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे.

Image Credited – Navbharattimes

दोघांचे प्रक्षिक्षक असलेले चैतन्य वेलहाल म्हणाले की, दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली. निकेतने सांगितले की, तो आता फूल आयरनमॅन मॅरोथॉनची तयारी करणार आहे.

Leave a Comment