लाँच केलेल्या बाईकच्या स्पेशल एडिशनची कावासाकीने कमी केली 1 लाख रुपये किंमत

कावासाकी मोटरने भारतात 2020 कावासाकी झेड900 बीएस4 बाईकचे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. या स्पेशल एडिशन बाईकची किंमत 7.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

ही बाईक याआधी मागील वर्षी डिसेंबरमध्ये बीएस-6 मानक इंजिनसह लाँच करण्यात आलेली आहे. मात्र किंमत कमी करण्यासाठी कंपनीने या बाईकला बीएस-4 स्पेशल एडिशन म्हणून लाँच केले आहे. बी स्पेशल एडिशन बाईक बीएस-6 इंजिनपेक्षा 1 लाख रुपयांनी स्वस्त आहे. बीएस-6 इंजिनच्या कावासाकी झेड900 बाईकची किंमत 8.5 लाख ते 9 लाख रुपये आहे.

Image Credited – kawasaki-india

कंपनीने या स्पेशल एडिशन बाईकमध्ये छोटे-मोठे बदल केले आहेत. यात एलईडीसोबत नवीन हेडलॅम्प देण्यात आलेले आहेत. फ्यूल टँकसह मागील बाजूला काही बदल करण्यात आले आहेत. बाईकच्या इंस्ट्रूमेंट कंसोलला देखील बदलण्यात आले असून, यात 4.3 इंच टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे, जी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसोबत येते.

Image Credited – autocarindia

स्पेशल एडिशन झेड900 मध्ये 948 सीसी 4 सिलेंडर बीएस4 इंजिन मिळते. जे 123बीएचपी पॉवर आणि 98.6एनएम टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड गिअरबॉक्स मिळतात. बीएस6 व्हर्जन इंजिनमध्ये देखील याच पॉवरचे इंजिन मिळते. बाईकच्या चेसिस आणि सस्पेंशनला देखील अपग्रेड करण्यात आलेले आहे.

यात स्पोर्ट्स, रेन, रोड आणि मॅन्युअल असे 4 रायडिंग मोड्स मिळतील. बाईक टॅलिक ग्रेफाइट ग्रे/मॅटेलिक स्पार्क ब्लॅक आणि मेटॅलिक स्पार्क ब्लॅक/मेटॅलिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. बाईकचे लिमिटेड यूनिट्स उपलब्ध असून, फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत बाईकची डिलिव्हरी सुरू होईल.

Leave a Comment