हिरो इलेक्ट्रिकने सादर केली तीन चाकी स्कूटर

ऑटो एक्स्पो 2020 मध्ये हिरो इलेक्ट्रिकने देशातील पहिली तीन चाकी (ट्राइक) इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. कंपनीने या स्कूटरला हिरो इलेक्ट्रिक एई-3 असे नाव दिले असून, यात अनेक खास फीचर्स देण्यात आलेले आहेत.

हिरो इलेक्ट्रिक AE-3 ट्राइक मध्ये 3.0kW ची मोटार आणि 48V/2.4kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. या बॅटरीला फुल चार्ज होण्यास 5 तास लागतो. कंपनीचा दावा आहे की, फुल चार्जमध्ये ही स्कूटर 100 किमी अंतर पार करेल. या स्कूटरची टॉप स्पीड ताशी 80 किमी आहे.

Image Credited – Navbharattimes

यामध्ये सेल्फ स्टँडिंग स्टेबिलिटी फीचर देण्यात आलेले आहे. यासाठी यात जायरोस्कोप देण्यात आलेले आहेत. या स्कूटरमध्ये एक ऑटो बॅलेंस पार्क स्विच असून, ज्याद्वारे पार्किंग करताना स्कूटर स्वतः बॅलेंस करते. स्कूटरमध्ये रिव्हर्स असिस्टंट देखील देण्यात आलेले आहे.

Image Credited – Navbharattimes

हिरो इलेक्ट्रिकच्या या स्कूटरमध्ये फूल डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल देण्यात आले आहे. ज्यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, जीपीएस, रिअल टाइम ट्रॅकिग आणि जिओ फेसिंगची सुविधा मिळेल. सोबतच यात मोबाईल चार्जर आणि वॉक असिस्टंट सारखे फीचर्स देखील आहेत. या स्कूटरमध्ये फ्रंटला दोन डिस्क आणि मागे सिंगल डेस्क ब्रेक मिळेल.

हिरो इलेक्ट्रिक ट्राइक स्कूटरची किंमत 1.5 ते 2 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment