वादळामुळे विमानाने न्यूयॉर्क ते लंडन अंतर विक्रमी वेळेत केले पार

ब्रिटिश एअरवेजच्या सबसोनिक विमानाने विक्रमी वेळेत न्यूयॉर्क ते लंडन हे अंतर पार करत सर्व विक्रम मोडले आहेत. बोईंग 747 एअरक्राफ्टने अवघ्या 4 तास 56 मिनिटात न्यूयॉर्क ते लंडन हे अंतर पार केले. सिआरा वादळ ब्रिटनच्या दिशेने येत असल्याने एवढ्या लवकर हे अंतर पार करण्यात आले.

ऑनलाईन फ्लाईट ट्रॅकिंग सर्व्हिस फ्लाइटरडार24 नुसार, यावेळी ब्रिटिश एअरवेजच्या विमानाचा टॉप स्पीड ताशी 1,327 किमी एवढा होता. न्यूयॉर्कवरून उड्डाण घेतलेले विमान पहाटे 4 वाजून 43 मिनिटांनी लंडनच्या हेथरो विमानतळावर पोहचले. आपल्या नियोजित वेळेपेक्षा हा कालावधी 2 तासांनी कमी आहे.

सर्वसाधारणपणे विमानाला लंडन ते न्यूयॉर्क अंतर पार करण्यासाठी सरासरी 6 तास 13 मिनिटे लागतात. यासोबतच ब्रिटिश एअरवेजने न्यूयॉर्क ते लंडन हे अंतर पार करण्याचा नॉर्वेजियन एअरलाइनचा विक्रम देखील मोडला आहे.

Leave a Comment