गेट्स यांनी खरेदी केली इतक्या कोटींची सुपरयॉट

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी शानदार सुपरयॉट खरेदी केली आहे. ही सुपरयॉट केवळ तरळ हायड्रोजनद्वारे चालते. या सुपरयॉटमधून कार्बन नाही तर केवळ पाण्याचे उत्सर्जन होते.

370 फूट लांब या सुपरयॉटची किंमत 645 मिलियन डॉलर (जवळपास 4,600 कोटी रुपये) आहे. मागीवर्षीच या सुपरयॉटच्या योजनेला मोनेको यॉट शो मध्ये सादर करण्यात आले होते. ही आतापर्यंतच्या सर्वात महागड्या सुपरयॉट पैकी एक आहे. ही सुपरयॉट वर्ष 2024 मध्ये बनून तयार होणार आहे. सांगण्यात येत आहे की, या यॉटमध्ये एकदा इंधन भरल्यानंतर ही विना थांबता जवळपास 6500 किमी प्रवास करू शकते.

या सुपरयॉटमध्ये 5 डेक असतील, ज्यात 14 पाहुणे आणि 31 क्रू मेंबर्स प्रवास करू शकतील. या लग्झरी सुपर यॉटमध्ये एक जिम, योगा स्टुडिओ, ब्यूटी रूम, मसाज पार्लर आणि कॅस्केडिंग स्विमिंग पूलची देखील सुविधा आहे. या सुपरयॉटचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे याचे 2 सील्ड टँक आहेत, या दोन्ही टँकचे तापमान जवळपास -253 डिग्री सेल्सियस आहे. यामध्ये तरळ हायड्रोजन असून, याद्वारे सुपरयॉटला पॉवर मिळते.

बिल गेट्स उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सुपरयॉटचा प्रवास करण्यासाठी अनेकदा चर्चेत आलेले आहेत. मात्र यापुर्वी ते भाड्याने घेण्यात आलेल्या यॉट्सचा वापर करत असे, त्यांनी पहिल्यांदाच स्वतःची सुपरयॉट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सुपरयॉटच्या मागील बाजूला दोन एंटरटेनमेंट भाग आहे. पहिल्या सनबाथ आणि दुसऱ्यात आउटडोर डायनिंगची व्यवस्था आहे. समुद्रात थंडीपासून वाचवण्यासाठी यात जेल फ्यूड फायर बाउल्सची देखील सुविधा असेल.

Leave a Comment