रेनोल्टची चिमुकली ट्वीझी इव्ही ऑटो एक्स्पोचे आकर्षण


ग्रेटर नॉयडा मध्ये सुरु असलेल्या ऑटो एक्स्पो २०२० मध्ये बड्या कार कंपन्या विविध सेगमेंट मधील कार्स सादर करत असतानाचा रेनोल्टच्या चिमुकल्या ट्वीझी इव्हीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही फोर व्हील क्वाड्री सायकल आकाराने अगदी चिमुकले इलेक्ट्रिक वाहन असून युरोपियन बाजारात त्याला खूप मागणी असल्याने ते या ऑटो शो मध्ये सादर केले गेल्याचे सांगितले जात आहे.

दोन प्रवासी आरामात प्रवास करू शकतील अश्या या वाहनाची बॅटरी फुल चार्ज केली तर १०० किमी अंतर हे वाहन कापू शकते. ट्वीझीचा टॉप स्पीड ताशी ८० किमी आहे. दिसायला अतिशय स्मार्ट आणि आकर्षक अश्या या वाहनाची खासियत म्हणजे त्याला पार्किंग साठी अगदी थोडी जागा लागते व यामुळे गर्दीच्या शहरातील वाहतूक समस्येवर हा एक उपाय ठरू शकतो. या वाहनात बूट स्पेस पुरेशी असल्याने सामान ठेवण्यास पुरेशी जागा आहे.

या ट्वीझीला लिथियम बॅटरी गिअर बॉक्स सह दिली गेली असून सिंगल गिअर रीड्युसर दिला गेला आहे. ट्वीझी चे दरवाजे अगदी स्टायलिश असून त्यामुळे तिचा लुक अधिक आकर्षक झाला आहे.

Leave a Comment