आर्मी मेजरने तयार केले बुलेटप्रुफ हेल्मेट


फोटो सौजन्य इंडिया टाईम्स
हेल्मेट सक्ती असावी की नसावी हा वादाचा विषय असला तरी बहुतेक लोक अपघातात डोक्याचे संरक्षण व्हावे आणि पोलिसांनी विना हेल्मेट पकडले तर दंड भरावा लागू नये यासाठी का होईना हेल्मेट वापरतात. पण हीच बाब जेव्हा भारतीय लष्कराशी जोडली जाते तेव्हा सैनिकांना शत्रूच्या गोळ्यांपासून डोक्याचा बचाव होण्यासाठी हेल्मेट फार आवश्यक असते. पुणे येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनीअरिंग मधील मेजर अनुप मिश्रा यांनी केंद्राच्या अभेद्य प्रोजेक्ट खाली बुलेटप्रूफ हेल्मेट तयार केले असून जगातील या प्रकारचे हे पहिले हेल्मेट असल्याचा दावा केला जात आहे.

विशेष म्हणजे याच मेजर अनुप मिश्रा याना त्यांच्या पूर्वी वापरात असलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या आतही गोळ्या घुसल्याचा अनुभव आला होता आणि त्यातून त्यांनी बुलेटप्रूफ अभेद्य जॅकेट तयार केले होते. आता त्यांनी सैनिकांना अतिशय उपयुक्त ठरेल असे हेल्मेट तयार केले आहे. स्निफर बुलेटपासून हे हेल्मेट जवानाच्या मस्तकाला संरक्षण देईल. १० मीटर लांबून आलेली गोळी थोपविण्यास हे हेल्मेट सक्षम आहे.

पुण्याच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनीअरिंग मध्ये प्रीमिअर टेक्निकल व टेक्निकल ट्रेनिंग संस्थेचेही काम चालते.

Leave a Comment