आंध्र प्रदेशात सुरु झाले देशातील पहिले ‘दिशा’ महिला पोलिस स्टेशन


विजयवाडा – आंध्र प्रदेश सरकारने महिलांच्या सुरक्षेबाबत पुढाकार घेत त्याअंतर्गत देशातील पहिले ‘दिशा’ महिला पोलिस स्टेशन राजामुंद्रीमध्ये सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी आंध्रचे सीएम जगन मोहन रेड्डी यांच्या हस्ते झाले. राज्यात 18 ‘दिशा’ पोलिस ठाणे सुरू केली जातील. ही पोलिस ठाणे 24 तास कार्यरत राहतील. दिशा नियंत्रण कक्ष 24 तास काम करेल. यासाठी 52 पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी तेलंगणामध्ये बलात्कार पीडित मुलीच्या नावावर महिला पोलिस ठाण्याचे नाव देण्यात आले आहे. डीजीपी गौतम सवांग यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये तेलंगणात ‘दिशा’ बलात्कार आणि खून प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी दिशा कायदा आणण्याच्या घोषणा केली होती. त्यांनी म्हटले होते, बलात्कार आणि हत्येच्या आरोपींना 21 दिवसांत फाशीची शिक्षा देण्यासाठी दिशा कायदा 2019 चा कायदा बनविला जाईल. आंध्र सरकारने एपी दिशा कायदा -2019 हा ठराव संमत करून राष्ट्रपतींकडे पाठविला.

दिशा पोलिस ठाण्यात या प्रकरणाची चौकशी करण्याबरोबरच फॉरेन्सिक लॅब आणि विशेष न्यायालय असेल. या न्यायालयात खटल्याची सुनावणी 21 दिवसात होईल. दिशानिर्देश कायद्यानुसार आरोपींवर कारवाई केली जाईल आणि कठोर शिक्षा दिली जाईल. याशिवाय दिशा अॅपचे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी एक विशेष कंट्रोल रूमही तयार करण्यात येणार आहे.

Leave a Comment