सोशल मीडियामुळे ‘या’ वकील महिलेचे नशीबच पालटले


ज्या क्षेत्रात सर्वात जास्त तुमची रुची आहे आणि त्याच क्षेत्रात काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली त्याला दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. पण आपल्याला कुटुंबातील इतर मंडळींच्या सल्ल्यामुळे आपण आपल्या आवडत्या क्षेत्राला बायबाय करून त्यांच्या आवडीनुसार काम करतो. पण ऑस्ट्रेलियातील एका महिलेने असे काही केले आहे की तिने सोशल मीडियाचे आभार मानले पाहिजेत, कारण सोशल मीडियात व्हायरल झालेल्या तिच्या एका फोटोने तिचे नशीबच पलटून गेले आणि तिला जे काम हवे होते तेच काम करायला तिला मिळाले. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते काम…

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील रहिवासी असलेल्या पिया मुअलेन्बेक पेशाने वकील होती. जिने आपल्या करियरची सुरुवात वकीलकिनी केली होती. पण मॉडेलिंगच्या वेडापायी तिने आपली प्रक्रियेत कॉर्पोरेट नोकरी सोडली. याचे कारण म्हणजे सोशल मीडिया. होय, सोशल मीडियावर ती नेहमीच आपले ग्लॅमरस फोटोज अपलोड करत असे. त्यानंतर तिचे फॉलोअर्स वाढत गेले. त्यानंतर तिला जाणीव झाली की आपण वकीली सोडुन मॉडेलिंग करावे. त्यानंतर तिने मॉडेलिंग विश्वात प्रवेश केला.

याबाबत डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार, तिने २०१४मध्ये वकिली सोडून मॉडेलिंगच्या क्षेत्रात आली तेव्हापासून ती पुढच्या काही महिन्यांतच स्टार बनली. तिने अनेक मासिकांकरिता मॉडेलिंग देखील केले आहे. प्रसिद्ध मासिक गार्सियाची ती मार्केट एडिटर देखील आहे.

काही वर्षांपूर्वी, पियाने आपली स्पोर्ट्सवेअर स्लिंकी (SLINKII) कंपनी सुरू केली आहे. ज्यामध्ये ती मुलींसाठी स्पोर्ट्सवेअर आणि बिकिनी विकते. कंपनीच्या हिटचे कारण पण सोशल मीडियाच आहे. ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या कंपनीचे प्रमोशन करते. इंस्टाग्रामवर काही वर्षात २ दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. तिने ही कंपनी आपल्या प्रियकराबरोबर सुरु केली आहे. ज्यामध्ये ती स्पोर्ट्सवेअरसह योगा पँट, क्रॉप टॉप आणि योगा चटई विकते.

Leave a Comment