महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये ‘सूर्यवंशी’च्या टीमचा सहभाग


अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी या तिघांनी महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने आयोजित आतंरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. तिघांचा फोटो सोशल मीडियावर अक्षयने शेअर केला आहे. अक्षयची रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’मध्ये मुख्य भूमिका आहे. तर, पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत अजय देवगन देखील दिसणार आहे.


हा फोटो अजय देवगनने देखील शेअर केला आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखालीच तयार झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटात अजयने पोलिसाची भूमिका साकारली होती. दरम्यान अभिनेता फरहान अख्तर आणि सुनील शेट्टी यांनीही महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. महाराष्ट्र पोलीस खात्याकडून देशात पहिल्यांदाच ‘महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल १७ हजार स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला असून यात महाराष्ट्र पोलीस खात्यातील ५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मुंबईतील कुलाबा येथील गेट वे ऑफ इंडिया पासून ते वरळी सी लिंक येथून पुन्हा गेट वे ऑफ इंडिया अशा ४२ किलोमीटरच्या आंतराष्ट्रीय मॅरेथॉनसह २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Leave a Comment