आत्मघातकी प्रवृत्तीस कारणीभूत ठरू शकतो कॉम्युटर आणि स्मार्टफोनचा सतत वापर


स्मार्टफोन व कॉम्प्युटरचा सतत उपयोग मानसिक आरोग्याकरिता चांगला नसल्याचे निदान आता वैज्ञानिकांद्वारेहे करण्यात आले आहे. ही दोन्ही माध्यमे अतिशय प्रभावी आहेत हे खरे असले, तरी या दोहोंचा उपयोगही आपल्या गरजांच्या अनुसारच व्हावयास हवा हे ही तितकेच खरे आहे. पण अनेकांना, विशेषतः तरुण मंडळींना या दोन्ही माध्यमांचे व्यसनच जडले आहे. या दोन्ही गोष्टी आजकालच्या तरुणाईच्या लाईफ लाईन्स झाल्या आहेत. पण यांच्या अतिवापराने शरीरावर विपरीत परिणाम होऊन दृष्टी खराब होणे, किंवा निद्रानाशासारखे विकार जडणे अश्या तक्रारी तर उद्भवतातच, पण शिवाय यांचा मनावरही विपरीत परिणाम होताना दिसतो. अलीकडेच केल्या गेलेल्या रिसर्चध्ये हे निदान करण्यात आले आहे, की स्मार्ट फोन आणि कॉम्प्युटर यांचा सतत उपयोग करणाऱ्यांमध्ये आत्मघातकी प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. मुलींच्या बाबतीत हे प्रमाण जास्त असल्याचे समजते.

अमेरिकेतील सॅन डियेगो स्टेट विद्यापीठामध्ये या संबंधी अधिक रिसर्च केला गेला आहे. येथील जीन त्वेंग यांनी, किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक स्वास्थ्याशी निगडीत समस्या वाढीला लागल्याचे म्हटले आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरचा बेबंद उपयोग, हे आहे. हा रिसर्च करणाऱ्यांनी सुमारे पाच लाख मुला-मुलींकडून प्रश्नावलीच्या माध्यमातून डेटा गोळा करीत त्याचा अभ्यास केला होता.

ह्या अभ्यासानुसार, तेरा ते पंधरा या वयोगटातील सुमारे पासष्ट टक्के मुला-मुलींच्या मनामध्ये आत्मघातकी विचार येत असल्याचे म्हटले आहे. ही मुले-मुली आपला जास्तीत जास्त वेळ स्मार्ट फोन किंवा कॉम्प्युटरचा वापर करण्यात घालवीत होती. त्यामुळे ही मुळे एकलकोंडी बनली. या कारणाने त्यांच्यामध्ये आत्मघातकी प्रवृत्ती वाढल्या असे या अभ्यासाद्वारे निदान करण्यात आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment