‘केजीएफ चॅप्टर-2’ मध्ये मस्त-मस्त गर्लची एंट्री


कन्नड चित्रपट ‘केजीएफ’चा दुसरा भाग म्हणजेच ‘केजीएफ चॅप्टर 2’ मध्ये संजय दत्तनंतर आता रवीना टंडन एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात रवीना डेथ वॉरंट जाहीर करणार्‍या पंतप्रधान रमिका सेनची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील करत आहेत. हा चित्रपट जुलै 2020 मध्ये रिलीज होणार आहे.

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘खानदानी शफाखाना’ चित्रपटात रवीना टंडन एका खास भूमिकेत दिसली होती. यापूर्वी 2015 मध्ये बॉम्बे वेलवेटमधून ती इंडस्ट्रीमध्ये परतली होती. यानंतर 2017 साली तिचे मातृ, हनुमान द दमदार आणि शब हे तीन चित्रपट आले होते. त्याचबरोबर परिक्षक म्हणून तिने टेलिव्हिजन रिअॅलिटी शोमध्ये देखील प्रवेश केला.

केजीएफचा पहिला भाग केवळ 50-80 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला. ज्याने जवळपास 243-250 कोटींचा व्यवसाय केला. केजीएफ चॅप्टर 2 मध्ये यश, अधीरा, संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, अनंत नाग, मालविका अविनाश हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाच्या कथेत असेही समोर आले आहे की रॉकी म्हणजेच यश या भागातील 3 शत्रू गरुना, इनायत खलील आणि रीनाचा प्रियकर कमल यांच्याशी लढताना दिसेल. चित्रपटाच्या या सीक्वेन्समध्ये त्याचा मृत्यू होईल.

Leave a Comment