सोलापूरच्या तरुणाने बनवले हार्लेचे नवीन डिझाईन, पेटेंटसाठी केले 7 अर्ज


सोलापूर – आपल्या हेव्हिवेट स्टाईलिश बाईकसाठी हार्ले डेव्हिडसन जगभरात प्रसिद्ध आहे. या वर्षाच्या शेवटी नवी बाईक ब्रॉन्क्स बाजारात आणणार आहे. विशेष म्हणजे सोलापुरात राहणार्‍या चेतन शेडजाळे यांनी याचे डिझाईन केले आहे.

यासंदर्भातील वृत्त दैनिक भास्करने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार चेतन याबाबत सांगतात की कार माझ्यासाठी डब्यासारखी आहे, म्हणून मला बाईक डिझाईन करण्याची आवड आहे. मी डिझाइनशी संबंधित 7 पेटंटसाठी अर्ज केला आहे. जे यावर्षी माझ्या नावे होईल. चेतन सध्या इटलीमधील हार्ले कंपनीत आहेत.

हार्लेच्या 975 सीसी आणि 1250 सीसी इंजिन विभागातील ही पहिली बाइक असेल. सध्या या बाईकची गणना जगभरातील टॉप -10 मध्ये केली जात आहे. लहानपणापासूनच चेतनला बाईकबद्दल खास आकर्षण आहे. 2001 मध्ये त्यांनी आर्किटेक्चर अभ्यास पूर्ण केला. परंतु भारतात वाहनांच्या डिझाईन करण्याच्या प्रशिक्षणासाठी कोणतीही संस्था नव्हती. यामुळे त्यांनी इटलीमधील मिलान येथे कार आणि ट्रान्सपोर्टेशन डिझायनिंगचा अभ्यास केला.

यानंतर चेतन फियाटमध्ये दाखल झाले. परंतु त्यांना चारचाकी वाहनांच्या डिझाइनमध्ये रस नव्हता, म्हणून २०१० मध्ये हार्ले डेव्हिडसनमध्ये सामील झाले व तेव्हापासून तेथे आहे. चेतनने ब्रॉन्क्सपूर्वी हार्लेच्या स्ट्रीट प्रोजेक्टमध्येही काम केले आहे. यापूर्वी त्याने 750 सीसीची स्ट्रीट रॉड डिझाइन केली.

Leave a Comment