कॉफी प्या, उदंड जगा


तुम्ही कॉफीप्रेमी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दिवसातून तीन ते चार कप कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो. तसेच कॉफी पिणाऱ्यांना हृदयविकाराचा धोकाही कमी असतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

‘बीएमजे’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ साउथम्पटनचे रॉबिन पूले यांच्या नेतृत्वाखालील एका चमूने हा अभ्यास केला.

यात अभ्यासकांनी 200 पेक्षा अधिक संशोधनाची समीक्षा केली. त्याचा निष्कर्ष काढताना त्यांनी दावा केला, की काही प्रकारचे कर्करोग, मधुमेह, यकृताचे आजार आणि स्मृतिभ्रंश यांसारखे आजार कमी करण्याशीही कॉफी पिण्याचा संबंध आहे. त्यामुळे कॉफीमुळे आरोग्याला नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

मात्र गर्भवती स्त्रीने कॉफी पिणे हे तोट्याचे ठरू शकते. तसेच दिवसातून 3-4 कपांपेक्षा जास्त कॉफी पिल्याने नुकसान काही होत नाहीत. मात्र त्याचे फायदे कमी होतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment