तांब्याच्या भांड्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे


घरामध्ये असललेल्या तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी पिताना आपण अनेकांना पाहिले असेल. विशेषतः रात्रभर हे पाणी साठवून ठेऊन सकाळी उठल्या उठल्या हे पाणी पिण्याची रीत आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी आरोग्यास हितकारी समजले गेले आहे. आयुर्वेदाप्रमाणे आपल्या शरीरामध्ये वात, कफ आणि पित्त हे तीन दोष आहेत. या त्रिदोषांना संतुलित ठेवण्याचे काम तांबे करीत असते. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवल्याने त्या तांब्याचे गुण पाण्यामध्ये उतरतात, व हे पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक तांबे या पाण्याद्वारे मिळते. तांब्याच्या भांड्यामध्ये साठविलेले पाणी पिताना ते पाणी किमान आठ तास साठविलेले हवे.

तांबे हे पोट, किडनी आणि लिव्हर यांचामध्ये साठलेली घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करीत असून पोटाला हानी पोहोचविणाऱ्या बॅक्टेरीयांनाही नष्ट करते. तसेच वारंवार अॅसिडीटी किंवा गॅसेस होत असल्यासही तांबेयुक्त पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी पिणे चांगले. पोटामध्ये अल्सरचा त्रास असल्यास ही तांबेयुक्त पाण्याचे सेवन करावे. तांब्यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत, ज्यामुळे सांध्यांवर आलेली सूज किंवा सांधेदुखी कमी होण्यास मदत मिळते. तांबे हाडांना मजबूती देते, व शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवते. त्यामुळे तांबेयुक्त पाण्याचे सेवन अवश्य करावयास हवे.

तांबे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. तांब्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण करणाऱ्या फ्री रॅडीकल्स वर नियंत्रण राहते. परिणामी तुम्ही अधिक तरुण दिसू लागता. तसेच तांबेयुक्त पाण्याच्या सेवनाने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यासही मदत मिळते. ताम्बेयुक्त पाण्याच्या सेवनाने शरीराची पचनक्रिया देखील चांगली राहते. ह्या पाण्याने शरीरातील अनावश्यक चरबी नाहीशी होण्यास मदत मिळून वजन कमी होते.

तांब्यामध्ये अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरियल गुण असल्याने शरीराचे कोणत्याही प्रकारचे घाव किंवा जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. शरीराच्या आतील घावही लवकर भरून येण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment