रंगीन मिजाज आहे उत्तर कोरिया हुकूमशहा किम जाँग


वॉशिंग्टन उत्तर कोरियाच्या हुकूमशहा किम जाँगने अमेरिका, जपानसह सर्व देशांच्या नाकी नऊ आणले आहेत. किम जाँग आपल्या सनकी निर्णयांखाली उत्तर कोरिया केवळ क्षेपणास्त्राची चाचणीच करत नाही तर अमेरिकेला धमकावत देखील आहे.

किम जाँगच्या खाजगी जीवनाबद्दल ब-याच गोष्टींचा खुलासा अलीकडेच झाला आहे. पाश्चात्य देशांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांमध्ये असे आढळून आले आहे की किम जाँग कशा प्रकारे आपले अय्यशी जीवन जगत आहे. यासंबंधीच्या महत्वाच्या गोष्टीवर एक नजर –

किम जाँगने लहान मुलींना आपल्या यौनदासी बनवून ठेवले आहे. या त्या मुली आहेत ज्या कोरियातील अनेक शाळांमधून निवडल्या गेल्या आहेत. ब-याच जणांना अत्यंत खतरनाक पद्धतीने जीवे मारले जाते आणि हे सर्व या मुलींच्या समोर केले जाते.

हा खुलासा उत्तर कोरियाच्या एका महिलेने केला आहे. जिच्या वडील किम जाँग याच्यासोबत त्यांनी काम केले आहे. आता ही महिला उत्तर कोरियाहून पळून गेली आहे. माध्यम अहवालात बदललेले नाव योन लिम असे लिहिले गेले आहे. असे म्हटले जाते की किम जाँग एका आलिशान महालात वास्तव्यस आहे आणि तो तिथून त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावतो.

किमच्या राजवटीत २.५ कोटी लोकांना तुरुंगवास भोगावा लागला आहे आणि त्यांना येथे उपाशी मरण्यास भाग पाडले जात आहे. लिमच्या मते, किम नेहमीच युद्धाची धनकी देत असतो. कारण त्याच्याकडे जगात स्वतःला लपण्यासाठी जागाच उरलेली नाही. किमने देशात स्वत: साठी अनेक गुप्त महल बनवले आहेत. जेव्हा त्याला एकाच ठिकाणी धोका असल्याचे लक्षात येते तेव्हा तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतो. हेच कारण आहे की इतर देशांतील गुप्तहेर त्याचा ठावठिकाणा शोधू शकत नाहीत.

किमसाठी त्याचे अधिकारी शाळेतील मुली निवडतात. सुंदर मुलींना त्यांच्या इच्छेविरूद्ध हुकूमशाहाच्या सोबत ठेवले जाते. तत्पूर्वी या मुलींना हुकूमशहासमोर कसे वागायचे याचे प्रशिक्षण दिले जाते. जेव्हा ती मुलगी गरोदर होते तेव्हा तिला गायब केले जाते. नंतर, या मुलींचे किमच्या जवळच्या अधिकाऱ्यासोबत लग्न लावून दिले जाते. किम विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. याचदरम्यान त्यांची बायको रि सोल-झू त्याच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात अतिशय कमी प्रमाणात दिसली आहे.

किमला “बर्ड नेस्ट सूप” सर्वात जास्त पसंत आहे. हे चीनी दुर्मिळ व्यंजन आशियाई स्विफ्ट पक्ष्यांच्या लाळांच्यापासून बनविले जाते. ३३ वर्षीय किम जॉँगबाबत असे म्हटले जाते की त्याने स्वित्झरलँडमधून शिक्षण पूर्ण केले आहे. तेथे त्याने चोल या बनावट नावाने प्रवेश घेतला होता. वडील किम जॉँग यांच्या मृत्यूनंतर वयाच्या ३०व्या वर्षी किम जाँग उत्तर कोरियाचा हुकूमशहा बनला होता आणि आता त्याच्या विलक्षण धोरणामुळे तो जगभरात तणाव पसरत आहे.

Leave a Comment