तुम्ही पाहिला आहे न्युझीलंडचा छोटा बुमराह ?

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या हटके गोलंदाजी शैलीसाठी ओळखला जातो. वेगळ्या शैलीमुळे अनेक फलंदाजांना बुमराहच्या गोलंदाजीवर खेळणे अवघड जाते. खूप कमी कालावधीमध्ये बुमराहने सर्वोत्तम गोलदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. अनेक युवा खेळाडू बुमराहप्रमाणे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यात एक मुलगा अगदी हुबेहुब बुमराहप्रमाणे गोलंदाजी करताना दिसत आहे.

न्यूझीलंडमधील स्थानिक क्रिकेट संघाचे प्रशिक्षक ऑली प्रिंगल यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा बुमराहप्रमाणे गोलंदाजी करत आहे.

हाच तर खरा दर्जा आहे, अशी इंग्लंडचा माजी खेळाडू जेम्स टेलर व्हिडीओ प्रतिक्रिया दिली. न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक माईक हेसॉन यांनी देखील हा व्हिडीओ रिट्विट करत मुलाचे कौतूक केले.

अनेक युजर्सनी या लहान मुलाचे गोलंदाजीचे कौतूक केले. या व्हिडीओला आतापर्यंत 40 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी पाहिले असून, शेकडो युजर्सनी यावर कमेंट केल्या आहेत.

Leave a Comment