
आजवर हिंदी सिनेसृष्टीला बरेच सुपरहिट चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेला ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा चित्रपट २०१३ साली रिलीज झाला होता. रोहितने आता याच चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग जर बनवण्यात आला, तर यामध्ये कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असतील, याचीही अस्पष्ट कल्पनाही त्याने दिली आहे.
‘चेन्नई एक्सप्रेस’च्या सिक्वेलमध्ये झळकणार ‘ही’ जोडी ?
रोहितला ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या सिक्वेलबाबत एका माध्यमाच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खानची जोडी मुख्य भूमिकेत घेण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले.सारा आणि कार्तिक यांचा पहिला एकत्रित चित्रपट ‘लव्ह आज कल’ अजून प्रदर्शित झाला नाही. पण ही जोडी चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय ठरत असल्यामुळे ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या सिक्वेलमध्ये दोघांची जोडी असावी, अशी इच्छा रोहितने व्यक्त केली.
