ही 92 वर्षीय व्यक्ती मागील 15 वर्षांपासून बेघरांना देत आहे मोफत जेवण

अन्नदानासारखे पुण्य नाही, असे म्हटले जाते. इटलीची राजधानी रोममधील एक 92 वर्षीय डिनो इम्पेग्लियाजो हे हेच काम मागील 15 वर्षांपासून करत आहेत. मागील 15 वर्षांपासून ते आठवड्यातील 3 दिवस 1000 गरीब व बेघरांना जेवण देतात. यासाठी त्यांनी एक खास किचन देखील तयार केले आहे. हे जेवण आठवड्यातून तीन रेल्वे स्टेशन्स आणि 1 दिवस प्रसिद्ध सैंट पीटर्स स्केअर येथे वाटले जाते. या कामात एक टिम त्यांची मदत करते.

डिनो सोशल सिक्युरिटी विभागात कार्यरत होते. ते निवृत्त आहेत. यासाठी त्यांनी एक असोसिएशन देखील सुरु केले आहे. ज्यात 300 लोक काम करतात. ते आठवड्यातून 4 दिवस फूड मार्केट आणि बेकरीजमध्ये दान मागतात. यानंतर जेवढी रक्कम दान म्हणून मिळते, त्याचे जेवण बनवून लोकांमध्ये वाटतात.

डिनो सांगतात की, त्यांनी याची सुरुवात 15 वर्षांपुर्वी रेल्वे स्टेशनवर भेटलेल्या गरजूपासून केली. आम्ही याद्वारे लोकांना जोडण्याचे काम करतो, जेणेकरून रोममधील लोकांमध्ये प्रेम आणि आपलेपणा कायम राहिल.

डिनो यांची टीम शनिवारी सैंट पीटर्स स्केअर येथे बेघरांना जेवण देते. येथे पोप फ्रान्सिस यांनी ओपन मेडिकल आणि अंघोळीची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे येथे मोठ्या संख्येत बेघर आढळतात. या कामासाठी डिनो यांना राष्ट्रपतींकडून देखील सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती सर्जिओ मटारेला यांनी त्यांना आपल्याकाळातील हिरो म्हटले आहे.

Leave a Comment