एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीकडून पंतप्रधानांनी संविधान समजून घ्यावे


इंदोर – गेल्या काही दिवसांपासून शहरातील बडवाली चौकी भागात सुधारणा नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना प्रसिद्ध शायर आणि गीतकार राहत इंदोरी यांनी संबोधित केले. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. जर संविधान पंतप्रधानांनी वाचले नसेल. तर एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीकडून त्यांनी संविधान समजून घ्यावे, असे राहत इंदोरी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी विनंती करतो की, जर संविधान त्यांनी वाचले नसेल. तर त्यांनी एखाद्या उच्चशिक्षित व्यक्तीला बोलवावे आणि त्याच्याकडून संविधानात काय लिहले आहे आणि काय नाही हे समजून घ्यावे, असे राहत इंदोरी म्हणाले.

प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांच्या ‘लाजिम है कि हम भी देखेंगे’ ही कविता वादग्रस्त आहे का हे ठरवण्यासाठी आयआयटी कानपूरने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. त्यावरूनही राहत यांनी टीका केली. फैज यांच्या कवितेचा अर्थ बदल्यानंतर मला विशेष काही वाटले नाही. कारण, त्यांच्या कवितेला देशविरोधी म्हणाऱ्यां लोकांना हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषेचे ज्ञान नाही, असे राहत म्हणाले.

Leave a Comment