ऑस्करआधी नामांकन मिळालेल्यांना दिले जाणार कोट्यावधींच्या भेटवस्तू

 

ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित होणे आणि 24 कॅरेट गोल्ड प्लेट ट्रॉफी घरी घेऊन जाणे हे चित्रपट सृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. मात्र ऑस्कर पुरस्कराव्यतरिक्त सोहळ्याच्या आदल्यादिवशी नामंकन मिळालेल्या कलाकारांना गुडी बॅग देण्याच्या परंपरेविषयी तुम्हाला माहिती आहे ? यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा 9 फेब्रुवारीला पार पडणार आहे. यंदा देखील नामांकन मिळालेल्या कलाकारांनी ही खास गुडी बॅग दिली जाणार आहे.

मार्केटिंग कंपनी डिस्टिंक्टिव अ‍ॅसेट्सतर्फे सर्वोत्तम अभिनेता, सर्वोत्तम अभिनेत्री, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्तम दिग्दर्शक अशा 24 नामांकिताना एव्हरिवन व्हिन्स ऑस्कर गिफ्ट बॅग्स दिल्या जातात.

या नामांकितांमध्ये मार्टीन स्क्रोसेस, क्वांटिन टारांटिनो, एन्टिनो बँन्डर्स, लिओनार्डो डीकॅप्रिओ, स्कार्लेट जॉन्हसन, रेनी झेलवेगर, मार्गोट रॉबी, टॉम हँग्स, एन्थोनी हॉपकिंस आणि ब्रॅड पिट अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

यंदाच्या वर्षीच्या गिफ्ट्सची किंमत 2,15,000 डॉलर (जवळपास दीड कोटी रुपये) असून, ऑस्कर सोहळ्याच्या एक आठवड्यापुर्वीच हे गिफ्ट दिले जातील.

या गिफ्टमध्ये 12 दिवसांची लग्झरी यॉटमध्ये ट्रिप, जोडीदारासोबत स्पेन लाईट हाऊसमध्ये ट्रिपचा समावेश आहे. यासोबतच 18 लाखांपर्यंतच्या किंमतीचे सौंदर्यप्रसाधने, स्मार्ट ब्रा, 24 कॅरेट वेप पेन, ब्रिटिश मॅचमेकिंग एजेंसी ड्रॉविंग डॉन द मूनची एक वर्षासाठी मेंबरशीप आणि मेडिटेशन हेडबँडचा देखील समावेश आहे.

Leave a Comment