सेहवागने हटके पद्धतीने सांगितला सत्य आणि खोटेपणामधील फरक

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सेहवाग आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर अनेक ज्ञानाच्या गोष्टी देत असतो. आता सेहवागने इंस्टाग्राम पोस्टद्वारे सत्य व खोटेपणामधील फरक अगदी थोडक्यात व हटके पद्धतीने सांगितला आहे.

इंस्टाग्रामवर सेहवाने #virugyaan सह पांढऱ्या टी-शर्टमधील एक फोटो पोस्ट केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने सत्याची डेबिट कार्डशी आणि खोटेपणाची क्रेडिट कार्डशी तुलना केली आहे.

सेहवागने लिहिले की, सत्य हे डेबिट कार्डसारखे आहे – आता पैसे द्या आणि नंतर आनंद घ्या. तर खोटे हा क्रेडिट कार्डसारखा आहे – आता आनंद घ्या आणि नंतर परतफेड करा.

सेहवागच्या या पोस्टवर आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक लाईक्स आणि 500 पेक्षा अधिक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment