… म्हणून या व्यक्तीने जाळले तब्बल 5 कोटी रुपये

अनेकदा लग्नांतर पती-पत्नीमध्ये पटत नसल्याने घटस्फोट घेण्याची वेळ येते. घटस्फोटानंतर प्रत्येक गोष्टीची एकमेकांमध्ये विभागणी केली जाते. कॅनडामध्ये एका उद्योगपतीने मात्र पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर तिला पैसे द्यावे लागू नये म्हणून चक्क पैशांना आग लावल्याची घटना घडली आहे.

पुर्व पत्नीला पैसे द्यावे लागू नये म्हणून ब्रुस मॅक्नविले या व्यक्तीने तब्बल 1 मिलियन डॉलर (जवळपास 5 कोटी रुपये) जाळले.

ब्रुस मॅक्नविलेने न्यायालयात सांगितले की, त्याची 6 बँक खाती होती. त्यातून त्यांनी सर्व पैसे काढले व 1 मिलियन डॉलरला आग लावली. कोणाचाच विश्वास बसला नाही म्हणून, ब्रुसने बँकेतून काढलेल्या पैशांची पावती देखील दाखवली.

त्याने सांगितले की हे सर्व पैसे त्याने संपत्ती विकून जमा केले होते. ब्रुसच्या या गुन्ह्यावर न्यायालयाने म्हटले की, हे केवळ व्यक्तीगतच नाही तर सार्वजनिक दृष्ट्या देखील बेजबाबदार आहे.  यासाठी त्याला 30 दिवसांचा कारावास आणि 2000 कॅनेडियन डॉलर दंडांची शिक्षा देण्यात आली आहे.

Leave a Comment