अरेच्चा ! नवरीने घातलेल्या साडीमुळे मोडले लग्न

एखादे लग्न कोणत्या कारणामुळे मोडेल याचा काही नेम नसतो. कर्नाटक येथे नवरीने घातलेली साडी पालकांना न आवडल्याने नवरदेवाने चक्क लग्नातून पळ काढल्याचे समोर आले आहे.

कर्नाटकच्या हसन गावातील बीएन रघूकुमार हा नवरदेव आपल्या आई-वडिलांच्या सांगण्यावरून चक्क लग्नालाच आला नाही.

रघूकुमार आणि बीआर संगीता हे एक वर्षांपुर्वी एकमेंकाच्या प्रेमात पडले होते. अखेर त्यांनी पालकांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या एका विधी दरम्यान साडीची गुणवत्ता न आवडल्याने नवरदेवाच्या पालकांनी नवरीला साडी बदलण्यास सांगितली होती. मात्र हीच गोष्ट नवरदेवाच्या पालकांना आवडली नाही व त्यांनी आपल्या मुलाला लग्नाच्या आधी पळून जाण्यास सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, नवरदेवाच्या पालकांविरोधात तक्रार दाखल केली असून, रघूकुमार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे.

Leave a Comment