भारतीय धावपटूने 27 तासात पुर्ण केले तब्बल 118 किमी अंतर

बंगळुरु येथील 30 वर्षीय भारतीय अल्ट्रा मॅरोथॉन धावपटू आकाश नांबियारने अबू धाबी ते दुबई हे 118 किमी अंतर 18 तासात पुर्ण करण्याचा विक्रम केला आहे. आकाशला ‘बेरफूट मल्लू’ नावाने देखील ओळखले जाते. त्याने हे अंतर यूएईमधील तरुणांना फिटनेसप्रती जागृक करण्यासाठी पार केले.

मुळचा केरळचा असलेल्या आकाशने 25 जानेवारीला अबू धावी कॉर्निचे येथून ई11 हायवे वरून धावण्यास सुरुवात केली व त्याने 26 जानेवारीला दुबई येथील आयबीएन बाटुटा मॉल येथे आपला प्रवास पुर्ण केला.

त्याने सांगितले की, यूएईमधील युवकांना फिटनेसला प्राधान्य देण्यासाठी, त्या प्रती जागृक करण्यासाठी हे आव्हान स्विकारले. यूएईमध्ये आरोग्य सेवा उच्च गुणवत्तेच्या आहेत, मात्र तरी देखील मधुमेह, कॅन्सर आणि ह्रदयाचे आजार होत असतात.

त्याने पुढे सांगितले की, लठ्ठपणा आणि धुम्रपानाचे प्रमाण देखील अधिक आहे. 35 वर्षांखालील लोक देखील शारीरिकरित्या सक्रिय नाहीत.त्यामुळे माझा मित्र खालेद अल सुवैदी याच्या पासून प्रेरणा घेत मी हे अंतर पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याने अबू धाबी ते मक्का हे अंतर धावत पुर्ण केले होते.

याआधी देखील नांबियारने श्रीलंकेमध्ये कोलंबो ते पुन्नावथुना हे 120 किमी अंतर धावत पुर्ण केले होते.

Leave a Comment