ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फेसबुकचे अधिकृत अकाउंट हॅक


सॅन फ्रान्सिस्को – शनिवारी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील फेसबुकचे अधिकृत अकाउंट हॅक करण्यात आले असून याबाबतची माहिती ट्विटरने स्वतः विधान जारी करत दिली. यामध्ये फेसबुकच्या अधिकृत अकाउंटला थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून निशाणा बनवण्यात आल्याचे सांगितले. ‘अवरमाइन ग्रुप’ नावाची सायबर गुन्हेगारी संघटनेचा या हॅकिंगमागे हात असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, फेसबुकचे सीईओ मार्क जुकेरबर्ग आणि ट्विटर प्रमुख जॅक डोर्सी यांचे अकाउंट या संघटनेने हॅक केले आहेत.

अशाचप्रकारे हॅकर्सनी इन्स्टाग्रामवर देखील फेसबुकचे अकाउंट हॅक केले आणि त्यावर ग्रुपचा फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये लिहिले की, अवरमाइन ग्रुपचे आम्ही असून त्याचबरोबर फेसबुकसुद्धा हॅक केले जाऊ शकते. पण ट्विटरपेक्षा चांगली त्यांची सुरक्षा आहे.

दरम्यान कोणत्या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मवरून फेसबुकचे अकाउंट हॅक केले याबाबत ट्विटरने कोणताही खुलासा केला नाही. अकाउंट खोरोस सोशल मीडिया मॅनेजमेंट टूलद्वारे हॅक केल्याचे म्हटले जात आहे. आपले सोशल मीडिया अकाउंट्सला मॅनेज करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग आणि पीआर कंपन्या खोरोजचा वापर करतात. ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, याप्रकरणाबाबत त्यांना जेव्हा समजले, त्यांनी तेव्हा लगेच अकाउंट लॉक केले. सध्या अशाप्रकारच्या अडचणी निस्तारण्यासाठी फेसबुक आणि ट्विटर एकत्र काम करत आहेत.

नुकतेच नॅशनल फुटबॉल लीगशी संबंधित 12 हून अधिक संघांचे ट्विटर अकाउंट अवरमाइन ग्रुपने हॅक केले होते. 2016 पासून हा ग्रुप सक्रिय आहे आणि यामागे सौदी अरेबियातील युवकांचा हात असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर फेसबुकने देखील सांगितले की, काही वेळासाठी आमचे कॉरपोरेट सोशल अकाउंट हॅक झाले होते, पण आता ते सुरक्षित करण्यात आले आहे.

Leave a Comment