या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही विकू शकता जुने कपडे

अनेकदा घरात वापरत नसलेले अनेक कपडे तशीच पडून असतात. आकार छोटा-मोठा झाल्याने आपण कपड्यांचा वापर करत नाही. अनेकदा असेच पडून असलेल्या कपड्यांना दान देखील केले जाते. मात्र तुम्ही असे कपडे ऑनलाईन देखील विकू शकता.

Image Credited – Entrackr

इलॅनिक (Elanic)

जुने कपडे ऑनलाईन विकण्यासाठी  इलॅनिक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. या वेबसाइटवर तुम्ही सहज जुने कपडे विकू शकता. येथे जुन्या कपड्यांची किंमत देखील चांगली मिळते. यासोबतच येथून तुम्ही जुनी कपडे विकत देखील घेऊ शकता.

Image Credited – financialexpress

ओएलएक्स (OLX) –

ओएलएक्सवर जुन्या कपड्यांसोबतच अनेक वस्तू विकता येतात. या साईटवरून तुम्ही कपडे विकू देखील शकता व खरेदी देखील करू शकता.

Image Credited – yourstory

ईताशी (Etashee) –

ईताशी देखील एक ऑनलाईन वेबसाइट असून, याचा वापर तुम्ही जुनी कपडे विकण्यासाठी करू शकता. ही एक फॅशन फोक्स्ड साइट आहे.

Image Credited – mapleridgenews

स्पॉयल (Spoyl) –

या साइटवर तुम्ही कपड्यांसोबतच ब्यूटी आणि बेबी प्रोडक्ट्स देखील खरेदी-विक्री करू शकता. या साइटवर तुम्ही पुस्तके देखील विकू शकता. या वेबसाईटचे एक अ‍ॅप देखील आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही ग्राहकांशा थेट बोलू शकता.

Image Credited – ABC

रीफॅशनर (Refashioner) –

रीफॅशनर या साइटवर तुम्ही जुनी बुट, बॅग्स, कपडे आणि अन्य सामान विकू शकता. या साइटवरून तुम्ही कलाकारांचे कपडे देखील खरेदी करू शकता.

Leave a Comment