विदेशवारीसाठी निघाले दीपिका-रणवीर


हिंदी सिनेसृष्टीत कायम चर्चेत असलेले लोकप्रिय जोडपे अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपण सुट्टीवर जात असल्याची माहिती दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन दिली आहे. दोन पासपोर्ट दीपिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहेत. दीपिकाने कॅप्शनमध्ये त्याची आणि तिची…सुट्टी, असे शेअर केलेल्या फोटोला दिले आहे.

View this post on Instagram

His & Hers…💞 #vacation

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


गेल्यावर्षी १४ नोव्हेंबरला या जोडीने इटलीमध्ये लग्न केले होते. दोघांनी पारंपरिक दाक्षिणात्य पध्दतीने विवाह केल्यानंतर उत्तर भारतीय विधीनुसारही विवाह केला होता. संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटांसह अनेक चित्रपटातून एकत्र भूमिका केल्या आहेत. कामाच्या पातळीवर दीपिकाचा अलिकडेच ‘छपाक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. रणवीर सिंग आगामी ‘८३’ या चित्रपटात काम करीत आहे.

Leave a Comment