सावधान ! लाखो भारतीयांच्या डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती ऑनलाईन विक्रीला

भारतातील लाखो लोकांच्या क्रेडिट-डेबिट कार्डची माहिती डार्क नेटवर विकली जात असल्याची माहिती समोर आली आहे. 4 लाखांपेक्षा अधिक जणांच्या कार्ड्सची धोक्यात असल्याचा खुलासा ग्रुप-आयबीने केला आहे. ही एक सिंगापूरची सायबर सिक्युरिटी कंपनी आहे.

ग्रुप आयबीच्या रिपोर्टनुसार 4,61,976 क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती डार्क वेबवर जोकर्स स्टॅशवर विकली जात आहे. विकल्या जाणाऱ्या माहितीमध्ये कार्ड नंबरसोबत सीव्हीव्ही कोड, कार्डची अंतिम तारीख, कार्डधारकाचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि घराचा  पत्ता याचा देखील समावेश आहे. ग्रुप आयबीने ही माहिती इंडियन कॉम्प्युटर इमर्जेंसी रिस्पाँस टीमला दिली आहे.

डार्क नेटवर विकल्या जाणाऱ्या या माहितीची किंमत जवळपास 4.2 मिलियन डॉलर (30 कोटी रुपये) आहे. मात्र ही माहिती डार्क नेटवर कशी पोहचली याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.

महाराष्ट्र सायबर पोलीसचे एसपी बालसिंग राजपूत यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून, यासाठी लवकरच एडवाइजरी जारी करण्यात येईल.

डार्क नेटवर भारतीयांची खाजगी माहिती विकली जाण्याची पहिला घटना नाही. याआधी देखील मागील वर्षी 13 लाख जणांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती लीक झाली होती.

Leave a Comment